काय ते शौर्य ।
काय तो निडरपणा काय ते राष्ट्रप्रेम काय ती स्वराज्यावरील निष्ठा . .
समोर मृत्यु आहे हे दिसत असूनही मृत्युला ही न घाबरता महाराष्ट्र मातीसाठी आपल्याच मातीत रक्ताचा अभिषेक घालणारा एक विर | |
एकदा विचारा या गडकोट किल्ल्यांना . .
विचारा _ या _ सह्याद्रीला . . . विचारा कधी भिमा इंद्रायणीला की
आमचे हे सर्जा छत्रपति शंभुराजे _ होते कसे 360 वर्षे झाली . . .
या भिमा इंद्रायणी आम्हाला सांगताहेत कि हे छत्रपति संभाजी महाराज आमच्यासारखेच नितळ आणी स्वच्छ चारित्र्याचे होते .
तो पुरंदर सांगतोय माझ्या कुशित जन्मलेले छत्रपति संभाजी महाराज हे माझ्यासारखेच बुलंद होते . . . .
तो प्रतापगड सांगतोय हे सर्जा छत्रपति संभाजी महाराज माझ्यासारखेच प्रतापि होते ।
तो दुर्गराज रायगड सांगतोय . हे छत्रपति संभाजी महाराज माझ्यासारखेच उत्तुंग आकाशासी स्पर्धा करणारे होते . . .
तो राजगड सांगतोय हे रणमर्द छत्रपति संभाजी महाराज माझ्यासारखेच पोलादि मनगटाचे होते . . . .
तो पन्हाळा सांगतोय कि हा माँसाहेब जिजाऊंच्या काळजाचा तुकडा माझ्यासारखाच सुंदर आणी अति रूपवान होते . . .
तो सांगतोय . हा छावा । छत्रपति संभाजी महाराज माझ्यासारखेच सिंहाच्या छताडाचे होते . . . .
तो रामशेज सांगतोय . हा मृत्युंजय । छत्रपति संभाजी महाराज माझ्यासारखेच अजिंक्य होते . . .
तो विशाळगड सांगतोय छत्रपति संभाजी महाराज हे माझ्यासारखेच विशाल मनाचे होते . . . .
तो शिवनेरी सांगतोय सईबाईसाहेबांच्या गर्भातुन जन्माला आलेले सूर्य माझ्यासारखेच पवित्र आणी पावन होते .
तो सहयाद्री गेली _ 360 वर्षे झाली _ आम्हाला हेच सां गतोय कि छत्रपति संभाजी महाराज हे ।
माझ्या या दर्याखोर्यात घनदाट अरण्यात वादळासारखा झेपावणारे गनिमावर तुटुन पडणारे , एकही लढाई न हरलेले वीर होते . . . .
या स्वराज्यातला प्रत्येक किल्ला सांगतो कि छत्रपती संभाजी महाराज कसे होते ,
तर सह्याद्री यासर्वांची साक्ष आहे.
ज्यांच्या नावाने मृत्युला देखील कापरं भरलं असे म त्युंजय छावा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा . . .

No comments:
Post a Comment